पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण न होणे हा स्वातंत्र्य सैनिकांचा व जनतेचा अवमान…

डाॅ. जयेंद्र परुळेकर; पालकमंत्र्यांच्या हस्तेच ध्वजारोहण होणे गरजेचे.

⚡सावंतवाडी ता.११-: अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीच्या १५ ऑगस्ट या पवित्र स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ध्वजारोहण हे मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते होत नाहीये. हा जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेचा तसेच स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या जिल्ह्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान नाही का? असा सवाल ठाकरे शिवसेना प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे उपस्थित केला.

दरम्यान स्वातंत्र्य दिना दिवशी त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते होणे हे गरजेचं आहे परंतु कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे कसं काय अशा अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिना दिवशी धरून करणार असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

You cannot copy content of this page