राजू मसुरकर: मुख्याधिकाऱ्यांचे वेधले लक्ष
⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी नगरपालिका मासळी मार्केटची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी वेळीच लक्ष घालून नागरिकांना होणाऱ्या समस्येचे निवारण करावे, अशी मागणी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केली आहे.
दरम्यान वृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांना मासे मार्केट मधील फरशी फुटल्याने तसेच जिन्यावरती रेलिंग गेले वर्षहून अधिक कालावधी खराब झालेले आहे. तेथे तात्पुरते स्वरूपात लाकडी मानग्याचे रेलिंग लावल्याने याकडे नगरपालिकेचा दुर्लक्ष झालेला आहे. यासाठी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने व सुरक्षिततेच्या दृष्टीने ताबडतोब कार्यवाही व्हावी अशी मागणी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केली आहे.
