वेळेत फॉर्म भरण्याचे प्रेमप्रकाश नाईक यांचे आवाहन
⚡दोडामार्ग ता.११-: अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्या संगीत परीक्षांची ऑनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2023 अशी आहे.अद्यापही ज्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे संगीत, गायन, वादन नृत्य विषयांचे परीक्षांचे फॉर्म भरले नसतील त्यांनी त्वरित फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी .नवीन विद्यार्थी असल्यास त्याने आपल्या सोबत आपले आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, जन्म दाखला घेऊन सायबर कॅफेत जावे व www.abgmvm. org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावा जर पूर्वी परीक्षा दिलेली असेल त्याच विषयाची पुढील परीक्षा द्यावयाची असेल त्यांनी पूर्वीचे प्रमाणपत्र सोबत घेऊन तसेच आधार कार्ड व पासपोर्ट साईज फोटो घेऊन त्याच पद्धतीने आपला फॉर्म भरावा व त्याची प्रिंट काढावी.स्वतःची सही पूर्ण करून तसेच आपल्या शिक्षकांची सही घेऊन तो फार्म आपण निवडलेल्या केंद्रावर नेऊन केंद्र व्यवस्थापकाकडे देणे, जर कोणी स्वरताल संगीत विद्यालय दोडामार्ग या परीक्षा केंद्रावर फार्म भरणार असतील तर या केंद्राचा केंद्र क्रमांक 972 असा आहे तरी ज्यांचा आपल्या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला असेल अशा विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षेचा फॉर्म भरावा व स्वर ताल संगीत विद्यालय दोडामार्ग या ठिकाणी आणून द्यावा असे आवाहन केंद्र व्यवस्थापक प्रेमप्रकाश नाईक यांनी केले आहे.
