चौकुळ प्राथमिक शाळांमध्ये शिवसेनेतर्फे प्रथमोपचार किट…

शैलेश परब यांचा उद्धव ठाकरे वाढदिवसानिमित्त उपक्रम

⚡आंबोली,ता.०७-: चौकुळ गावातील प्राथमिक शाळांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमोपचार पेटी भेट देण्यात आल्या. आंबोली जिल्हा परिषद मतदार संघातील चौकुळ प्राथमिक शाळेत उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, रमेश गावकर,बाळा गावडे,चंद्रकांत कासार,शब्बीर मणियार,अशोक परब,हिमांशू परब,राजू शेटकर,चौकुळ सरपंच बाबू शेटये,आंबोली मतदारसंघ विभाग अध्यक्ष बबन गावडे,उपसंघटक उत्तम पारधी,चौकुळ चे खरेदी विक्री संघ माजी चेअरमन अरुण गावडे,संतोष पाताडे,आंबोली ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत, डुबा राऊत,चौकुळ शाखा प्रमुख रुपेश गावडे,सुरेश चव्हाण,परशु गावडे,नितीन गावडे,जेष्ठ शिवसैनिक तुकाराम गावडे, प्रकाश गुरव,शंकर गावडे,सुनील राऊत,तळवडे चे प्रशांत बुगडे केंद्रप्रमुख आर.बी.गावडे,बाबा उर्फ कृष्णा गावडे सर,शिक्षिका रुपाली सलामवाडी,तसेच शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी बाळा गावडे म्हणाले,देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी शिक्षकांची भूमिका महत्वाची होती आज सुद्धा ती वेळ पुन्हा आली असून चांगले विद्यार्थी घडवणे म्हणजे देश घडवणे.चांगले विचार चांगला समाज घडवण्यासाठी आवश्यक असते. शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण त्याप्रमाणे समाजकारण केले. रमेश गावकर म्हणाले,या सरकारने शेतकाऱ्यांना,आरोग्य,शिक्षण यासाठी कार्य करता आले नाही,इथले शिक्षणमंत्री असताना सुद्धा शाळेत,महाविद्यालयात पुस्तके पोच झाली नाहीत.शैलेश परब हे गेली १५ वर्षे समाजसेवेचे काम करीत आहेत.आताचे सरकार सर्वसामान्यवर अन्याय करत आहेत,पैशाच्या स्वार्थासाठी जे सोडून गेले त्यांना किंमत न देता गावागावातील शिवसैनिकांनी आता पुन्हा जोमाने काम करूया. विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब म्हणाले, सिंधुदुर्ग पॅटर्न आता राज्यात तयार झाला आहे यात शिक्षक आणि पालकांची विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची आहे.सावंतवाडी मतदारसंघातच काम करायला आवडते, इथले सर्व पदाधिकारी निष्ठने काम करतात.आई वडीलानंतर शिक्षक हे गुरू महत्वाचे असतात.पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होण्यासाठी आशीर्वाद द्या”.चौकुळ शाळेत वह्या देखील पोच होतील असे सांगितले.

You cannot copy content of this page