भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कुडाळात नगरसेवक आमनेसामने

सर्वसाधारण सभेत ओहोळ मोजणी विषय तापला;नगराध्यक्ष सुवर्ण मध्य काढणार

कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतीच्या हद्दीतील केळबाईवाडी ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर पर्यंतच्या ओहोळ मोजणी विषया वरून भाजपचे स्विकृत नगरसेवक गणेश भोगटे यांनी सत्ताधारी भ्रष्टाचारी आहेत हा आरोप केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व भाजप नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. दरम्यान भाजपा गटनेता विलास काळकर यांनी सांगितले की, शहरातील ओहोळांची मोजणी झाली नाही आणि या ओहोळांवर अतिक्रमण होत राहिले तर भविष्यात पूर्ण शहर पाण्याखाली जाईल त्यामुळे हा विषय गांभीर्याने घ्यावा असे सांगितल्यावर नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांनी या विषयावर सुवर्ण मध्य काढला जाईल असे सांगितले.

कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, भाजपा गटनेचा विलास कुडाळकर, मुख्याधिकारी अरविंद नातू तसेच सर्व विभागाचे अधिकारी नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. या बैठकीमध्ये शहरांमध्ये दिवाबत्ती अनेक ठिकाणी बंद आहे ही कशामुळे आहे याबाबत स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे यांनी उपस्थित करून या प्रश्नावर अभि गावडे यांनी प्रशासनाला धारेवर धरले आपल्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे शहरातील दिवाबत्ती बंद आहे संबंधित ठेकेदाराचे बिल दिल्याशिवाय तो काम कसे करणार असा प्रश्न उपस्थित केला या चर्चेमध्ये नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, निलेश परब सहभागी झाले. यावर लवकरच तोडगा काढा असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले तसेच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबतही जाब विचारण्यात आला.

ओहोळांवरील अतिक्रमणे हटवा

या सभेमध्ये स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे यांनी मागणी केलेल्या केळबाई वाडी ते डॉ. आंबेडकर नगर पर्यंतच्या ओहोळाची मोजणी करून घ्या या मागणीनुसार भूमी अभिलेख विभागाकडून या मोजणीसाठी १३ लाख रुपये भरावे लागतील असे पत्र आले यावरून सत्ताधाऱ्यांनी एवढे रक्कम भरणे शक्य नाही असे सांगितल्यावर गणेश भोगटे यांनी सांगितले की इतर गोष्टींमध्ये भ्रष्टाचार करता मात्र लोकहितासाठी पैसे भरू शकत नाही असे सांगितल्यावर सत्ताधारी आणि भाजप नगरसेवकांमध्ये खडा जंगी झाले अखेर भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांनी सांगितले की कुडाळ शहरासाठी हा गंभीर विषय आहे ओहोळांची मोजणी करून त्यामधील गाळ काढून ते नियमित करणे आणि नैसर्गिक स्त्रोत संरक्षण करणे गरजेचे आहे या ओहोळांवर अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे झालेली आहेत यावर सुद्धा कारवाई करणे आवश्यक आहे त्यामुळे तहसीलदार आणि नगरपंचायतीची संयुक्त बैठक घेऊन यावर तोडगा काढावा अशी मागणी केली या मागणीला सर्वांनी सहमती दर्शवली.

त्या संस्थेवर कायदेशीर कारवाई होणार

या सभेमध्ये भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणच्या संदर्भात चर्चा झाली असता नगरपंचायतीने संबंधित संस्थेबाबत साताऱ्यातील धर्मादाय आयुक्तातांकडे मागितलेल्या माहितीमध्ये ही संस्था २०१९ मध्ये रद्द झाल्याचे पत्र आल्यामुळे याबाबत काय कारवाई करावी अशी विचारणा करण्यात आल्यावर भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांनी सांगितले की याबाबत कायदेशीर कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल करा ही प्रक्रिया लवकरच करण्यात येईल असे मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी सांगितले.

कचरा वेळीच उचलला जात नाही

या सभेमध्ये नगरसेवक अभी गावडे यांनी सांगितले की सध्या कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्त्यावर कचरा मारला जात नाही तसेच कचरा घेऊन जाणारी गाडी सुद्धा वेळेत येत नाही याबाबत नियोजन केले जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले यावेळी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर बाजार भरण्याबाबत विचारविनिमय करण्यात आल्यावर कोणत्याही छोट्या व्यापाऱ्याला त्रास देऊ नये हे काही दिवस छोट्या व्यापाऱ्यांना काही रक्कम मिळवून देतात त्यामुळे कोणीही त्याला त्रास देऊ नये असे सर्वानुमते ठरविण्यात आले.

You cannot copy content of this page