ऑनलाईन पद्धतीने केले पारितोषिक वितरण
*💫कुडाळ दि.०४-:* गांधी रिसर्च फाऊंडेशन ,जळगाव , मराठी विज्ञान परिषद, आणि नॅशनल इनोवेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतियोगितेत मोठ्या गटात कुडाळ तालुक्यातील भडगाव हायस्कूल मध्ये इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेणाऱ्या कु. निहार अमोल मुंज या विद्यार्थ्याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले आहे. यावेळी त्याला ५ हजार चे शैक्षणिक साहित्य, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत वरिष्ठ अणुऊर्जा वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डॉ. विपीन कुमार ( निर्देशक, नॅशनल इनोवेशन फाऊंडेशन), प्रा. जे.बी.जोशी ( अणुऊर्जा वैज्ञानिक), ए.पी.देशपांडे ( मानद सचिव, मराठी विज्ञान परिषद), डॉ. सुदर्शन आयगर ( माजी कुलगुरू, गुजरात विद्यापीठ) यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने पारितोषिक वितरण झाले आहे. या स्पर्धेत संपूर्ण देशातून विविध राज्यांतून १९५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. निहारने मिळवलेल्या या यशाबद्दल कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सावंत, सचिव संभाजी वळंजू, सर्व संचालक, मुख्याध्यापक राजन कर्पे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ यांनी त्याचे अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
