महसूल सप्ताह निमित्त फेरफार अदालत

११ जणांच्या नोंदीची मंजुरी करत सातबारा वितरण

⚡कणकवली ता.०४-: महसूल सप्ताह निमित्त
कणकवली मंडल अधिकारी कार्यालयात कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली फेरफार अदालत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ११ जणांच्या नोंदीची मंजुरी करुन सातबारा व फेरफार वितरण करण्यात आले
कणकवली मंडळ अधिकारी मेघनाथ पाटील यांनी महसूल दिनानिमित्त फेरफार अदालत कार्यक्रम घेतला. यावेळी कणकवली तलाठी सुवर्णा कडूलकर, कीर्ती कांबळे,वरवडे तलाठी श्रद्धा कोरगावकर आणि कोतवाल यांच्यासह सर्व खातेदार तसेच महेश लाड व अन्य पक्षकार उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महसूल सप्ताह निमित्त सर्व ठिकाणी महसुल विभागाच्या वतीने सेवा सप्ताह निमित्त गतिमान प्रशासन म्हणून काम करत आहे. त्या निमित्ताने कणकवलीतील मंडळ अधिकारी मेघनाथ पाटील यांच्या पुढाकाराने तलाठी,कोतवाल यांनी कणकवली मंडळाचे काम चांगले केले आहे. त्यामुळे महसूल दिनी या सर्वच कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला होता . यामध्ये ई पिक पाहणी बाबत खातेदारांना माहिती देण्यात येत आहे.त्यानंतर घर घर दाखले वाटप केले जात आहेत. तसेच सलोखा योजनेबाबत माहिती देखील दिली जात आहे. ४ ऑगस्टला वारस तपास कामी अदालत लावून सदर वारस तपास मोहिमेत ११ अर्ज प्राप्त झाले,त्या अर्जाप्रमाणे तलाठी यांनी गाव दप्तरी नोंदी केल्या. फेरफार अदालतीमध्ये दाखल नोंदीचे दाखले तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी कणकवली मेघनाथ पाटील यांच्या हस्ते सातबारा,आठ अ,फेरफार व दाखले यांचे वाटप करण्यात आले. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईचे अनुदान भरपाईचे धनादेश देखील सदर महसूल सप्ताहचा निमित्ताने देण्यात आले.

You cannot copy content of this page