*गरड येथे आयशर कंटेनरला आग

आगीचे कारण मात्र अस्पष्ट

*💫सावंतवाडी दि.०४-:* येथील गरड येथे एका उभ्या असलेल्या आयशर कंटेनरला आग लागली आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास २:४५ वाजता घडली आहे. याबाबतची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते नेल्सन फेराव, विशाल सावंत आणि जावेद शेख यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न केले. ही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

You cannot copy content of this page