⚡वेंगुर्ले ता.०२सहदेव राऊळ-: संदीप गावडे फाऊंडेशनच्या माध्यमातून युवा नेते संदिप गावडे यांनी मातोड येथील दिवंगत दशावतार कलाकार राजन गावडे यांच्या कुटुंबीयांना २० हजार रुपयाची आर्थिक मदत केली.
यावेळी कोनशी गावचे माजी सरपंच कृष्णा गवस, दशावतार कलाकार उदय राणे-कोनसकर, दादा राणे-कोनसकर, सौरभ गावडे आदी उपस्थित होते.
कलाकार गावडे यांचे नुकतेच निधन झाले. यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे, याबाबतची माहिती मिळताच श्री गावडे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर देत मदत केली.
