वृक्ष संवर्धनातून राजन गावडे यांची आठवण जोपासा – बाबा मयेकर

⚡वेंगुर्ला ता.०२-: प्रसिद्ध दशावतार कलाकार कै.राजन गावडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी खास करून त्यांच्या जन्मभूमीतील मातोंड न्यू इंग्लिश स्कूलची वृक्षारोपणासाठी आम्ही निवड केली. कै. राजन गावडे यांच्या आठवणींचे हे वृक्ष आपण सर्व मुलांनी, शिक्षक व ग्रामस्थांनी त्याचे संवर्धन करून ती आठवण कायमस्वरुपी जपावी असे आवाहन संस्था अध्यक्ष सीताराम उर्फ बाबा मयेकर यांनी केले.

दशावतार कला आणि कलाकार संवर्धन करण्याच्या दृष्टीने स्थापन झालेल्या सिधुदुर्गातील दत्तमाऊली दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशीय मंडळाला २० ऑगस्ट रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. ‘प्रवास दत्तमाऊलीचा, सोहळा त्रैवर्ष पूर्तीचा‘ अंतर्गत मातोंड न्यू इंग्लिश स्कूल येथे दशावतारातील अष्टपैलू कलावंत कै.राजन गावडे आठवण सहवासाची अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. मंडळातर्फे सुमारे २५ झाडे वृक्षारोपणासाठी भेट देण्यात आली. यावेळी मुंबई कमिटी सदस्य रावजी परब, स्कूलमधील एस.एस.घाडी, डी.ई.सारंग, एस.बी.चांदणे, पी.एस.सावळ, ए.यु.पाटील, मुख्याध्यापक व्ही.पी.मांजलकर, विद्यार्थी आणि दत्तामाऊली मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कै.राजन गावडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. डी.ई.सारंग यांनी वृक्ष संवर्धानाचा विश्वास देऊन उपस्थितांचे आभार मानले.
You cannot copy content of this page