दुचाकी चार चाकी परवाना कॅम्प तात्काळ सुरू करा…

शैलेश लाड: परिवहन अधिकारी श्री काळे यांच्याकडे केली मागणी..

बांदा/प्रतिनिधी
दुचाकी व चारचाकी परवाना काढण्यासाठी सावंतवाडी तालुक्यासाठी ठेवण्यात येणारा मासिक कॅम्प जागेअभावी बंद असल्याने तो वाहन चालकांची परवड होऊ नये यासाठी तात्काळ सुरु करावा तसेच बांदा सटमटवाडी येथील नियोजित सीमा तपासणी नाक्यात उपलब्ध असलेले गाळे जास्तीत जास्त प्रमाणात स्थानिक भूमिपुत्रांना द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष शैलेश लाड यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) नंदकिशोर काळे यांच्याकडे केली आहे.


सावंतवाडी विश्रामगृहाचे नूतनीकरणचे काम सुरु असल्याने जागा उपलब्ध होत नाही. सावंतवाडी येथे होणारा मासिक कॅम्प हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात मोठा असल्याने त्यादृष्टीने जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी सावंतवाडी नगरपरिषदेकडे करण्यात आल्याची माहिती श्री काळे यांनी केली. जागा उपलब्ध झाल्यास तात्काळ कॅम्प सुरु करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. दर महिन्याच्या २४ तारिखला सावंतवाडी येथे कॅम्प आरक्षित आहे.
तसेच बांदा येथील सीमा तपासणी नाक्याचा विषय हा न्यायप्रविष्ठ असून यावर तोडगा निघाल्यास नाका सुरु करण्याबाबतच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. नाका सुरु झाल्यास येथे उपलब्ध असलेल्या गाळ्यांची ई निविदा काढण्यात येणार आहे. परंतु त्याची सर्वस्वी जबाबदारी हि ठेकेदार कंपनीची राहणार आहे. यावेळी श्री काळे यांचे पुष्पगुच्छ देऊन श्री लाड यांनी आभार व्यक्त केलेत. यावेळी प्रशांत गवस उपस्थित होते.

You cannot copy content of this page