बांदा/प्रतिनिधी
बांदा नट वाचनालयाच्या वतीने वाचनालयाचे विद्यमान उपाध्यक्ष (कै.) सुभाष मोर्ये यांना आयोजित शोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अनेक वक्त्यांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या.
(कै.) मोर्ये हे गेली ३५ वर्षे बांदा नट वाचनालयात सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यामध्ये २५ वर्षे त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं होत. त्यांच्या मार्गदर्शनतून व उल्लेखनीय कार्यातून बांदा नट वाचनालयचा कायापालट झालेला आहे. त्यांचे योगदान हे संपूर्ण बांद्यासाठी सामाजीक व शैक्षणीक क्षेत्रात फार मोठं होते. श्री देव बांदेश्वर-भूमीका देवस्थान उपसमितीचे ते अध्यक्ष होते. डॉ. गायतोंडे चरीटेबल ट्रस्टचे ते अध्यक्ष होते. गोगटे- वाळके कॉलेजचे सदस्य अशा अनेक संस्थांमध्ये त्यांच काम वाखाणण्याजोग होत. त्यांना श्रद्धांजली वाहताना अन्वर खान, शंकर नार्वेकर, प्रकाश पाणदरे, गुरुनाथ नार्वेकर, महाबळेश्वर सामंत, अनंत भाटे, तुळशीदास धामापूरकर, राकेश केसरकर, एस. आर. सावंत, सौ. स्वप्निता सावंत यानी त्याच्या सोबतच्या आठवणीना उजाळा दिला.
या कार्यक्रमाला नट वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सचिव राकेश केसरकर, संचालक निलेश मोरजकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, जगन्नाथ सातोस्कर, सुधीर साटेलकर, प्रकाश पाणदरे, गुरुनाथ नार्वेकर, अन्वर खान, तुळशीदास धामापुरकर, गुरुदास चारी, अंकुश माजगावकर, सौ अनुराधा मोरे, प्रसाद गायतोंडे, अनंत भाटे, यशवंत माधव, गंगाराम गुरव, महाबळेश्वर सामंत, विजेंद्र देसाई, प्रकाश पोरे, सालु परेरा, शंकर नार्वेकर, महादेव वसकर, सौ स्वप्निता सावंत, ग्रंथपाल प्रमिला मोरजकर-नाईक, सुनील नातु, सौ. अमिता परब आदी उपस्थित होते.
नट वाचनालयातर्फे सुभाष मोर्ये यांना आदरांजली…
