⚡मालवण ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्हा कलाध्यापक संघाच्या अध्यक्षपदी न्यू इंग्लिश स्कूल आचराचे कलाशिक्षक प्रकाश महाभोज यांची निवड करण्यात आली.तर सचिवपदी संभाजी कोरे यांची निवड करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा कलाध्यापक संघाची सभा सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ पतपेढी सभागृहात संपन्न झाली यात सिंधुदुर्ग जिल्हा कलाध्यापक संघाची नूतन कार्यकारणीची निवड महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष बी. जी. सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आली.यात अध्यक्ष पदी प्रकाश महाभोज उपाध्यक्ष पदी संदीप साळसकर,प्रकाश केसरकर,सौ.गौरी तवटे सचिवपदी संभाजी कोरे
खजिनदारपदी तुळशीदास कुबल।
सावंतवाडी प्रतिनिधी:-श्री चंदन गोसावी वेंगुर्ला प्रतिनिधी:-श्री समीर पेडणेकर, मालवण प्रतिनिधी:-श्री वसंत मेस्त्री, कणकवली प्रतिनिधी:-
श्री रतन गिरी , कुडाळ प्रतिनिधी:-श्री भालचंद्र थवी, देवगड प्रतिनिधी:-श्री दत्ताराम कोकरे, दोडामार्ग प्रतिनिधी:- श्री योगेश गावित, वैभववाडी प्रतिनिधी:- श्री मंदार चोरगे यांची तर
सल्लागार म्हणून श्री प्रसाद राणे कणकवली, श्री प्रसाद राणे कोलझर श्री एल के सावंत आरोस श्री समीर चांदरकर कट्टा यांची निवड केली गेली.
यावेळी विद्यमान अध्यक्ष श्री रुपेश नेवगी ,सचिव श्री समीर चांदरकर यांचे त्यांच्या कारकिर्दीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
बॉम्बे आर्ट सोसायटी मधून आंतरराष्ट्रीय स्तरावर निसर्ग चित्राची निवड झाल्याबद्दल राजेश आजगांवकर पंढरपूर येथे अक्षर संमेलनात रांगोळीच्या उत्कृष्ट कार्याबद्दल व मार्गदर्शनाबद्दल समीर चांदरकर कला महर्षी बाबुराव पेंटर फाउंडेशन तर्फे आयोजित राष्ट्रीय कला प्रदर्शनात निसर्गचित्राला प्रथम पारितोषिकासह राष्ट्रीय कला पुरस्कार प्राप्त श्री सिद्धेश यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. श्री महाभोज यांच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
