जिल्हा क्रीडा अधिकारी जबाबदार:बदलीसाठी १५ ऑगस्टला उपोषणाचा पदाधिकाऱ्यांचा इशारा
सावंतवाडी ता.३१-: सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन राज्य कुमार कुमारी कबड्डी निवड चाचणी स्पर्धा आयोजना मध्ये सुमारे एक कोटीचा अपार केल्याचा आरोप जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथे केला, याला सर्वश्री जिल्हा क्रीडा अधिकारी जबाबदार असून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा 15 ऑगस्टला कोल्हापुर येथील क्रीडा संचालकांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी ते बोलताना पुढे म्हणाले जिल्हा क्रीडा फेडरेशन अनेक खेळाडूंवर अन्याय केला आहे, तसेच मोठ्या प्रमाणात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला आहे.या संदर्भात दातमागूने अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने 15 ऑगस्टला कोल्हापूर येथे उपोषण करण्यात येणार असल्याच देखील सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अर्चना घारे परब पदाधिकारी नंदन वेंगुर्लेकर जितेंद्र म्हापसेकर वसंत उर्फ अण्णा केसरकर जावेद शेख विकास केरकर दीनानाथ बांदेकर महेश कांढरकर आधी उपस्थित होते.
सौ.घारे परब म्हणाल्या, सिंधुदुर्गातील कबड्डी ची सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनने वाताहात लावली आहे खेळाडू तसेच पंचावर अन्याय केला आहे यामुळे कबड्डीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विविध शासकीय योजनांपासून राहत आहे याला कबड्डी फेडरेशन कारणीभूत असून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची त्याला साथ आहे कबड्डी सह सर्वच खेळांची जिल्ह्यात दयनीय अवस्था आहे अधिकारी बेजबाबदारपणे वागत आहेत क्रीडा अधिकाऱ्यांनी विविध संघटनाची अलीकडेच बैठक घेतली परंतु याचे कोणालाही निमंत्रण दिले नाही केवळ दोन खेळांचे प्रतिनिधी तेथे उपस्थित होते यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली ही परिस्थिती पाहता आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे लवकरच पालकांसह आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.
अण्णा केसरकर म्हणाले, मी फेडरेशनचा संस्थापक सदस्य असताना फेडरेशनच्या वतीने मला मयत दाखवण्यात आले या संदर्भात मी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे संबंधिताविरुद्ध न्यायालयात चारशिट दाखल करण्यात आले आहे तर धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांच्याकडे मी दाद मागितली होती जिल्हा कबड्डी फेडरेशन ची कार्यकारणी बरखास्त करून घेण्याची सूचना केली होती परंतु अद्यापही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही या संदर्भात आम्हाला दात मागावी लागेल राज्य फेडरेशनचे अध्यक्ष अजित पवार आहेत त्यांच्या निदर्शनासही ही बाब आणून देण्यात आलेली आहे.
श्री म्हापसेकर म्हणाले, जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या अपहाराबाबत क्रीडा संचालक कोल्हापूर यांच्याकडे चौकशी करण्यासाठी दाद मागण्यात आली आहे 15 ऑगस्ट पर्यंत चौकशी झाल्यास क्रीडा संचालक कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल तर श्री वेंगुर्लेकर म्हणाले जिल्ह्यात जिल्ह्यात क्रीडा प्रकार आहेत 46 क्रीडा प्रकार आहेत तर 22 पेक्षा जास्त क्रीडा संघटना आहेत परंतु जिल्हा क्रीडा अधिकारी या संघटनांना कधीच विश्वासात घेत नाहीत त्यामुळे सिंधुदुर्गात सर्व खेळांची दयनीय अवस्था झाली आहे त्याला जिल्हा क्रीडा अधिकारीच कारणीभूत आहेत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. विकास केरकर यांनी जिल्हा कबड्डी फेडरेशन चा कारभार मनमानी पद्धतीने चालला होता त्याला अण्णा केसरकर यांनी चाप दिला आहे आता जिल्हा कबड्डी फेडरेशन ची निवडणूक लावणे आवश्यक आहे जेणेकरून नवीन खेळाडूंना संधी मिळेल.
