असलदे येथील वनराईत ५०० वृक्षांची लागवड करत समाजासमोर निर्माण केला आदर्श

⚡कणकवली ता.३१-:
असलदे गावची ग्रामदैवत श्री. देव रामेश्वर व पावनादेवी मंदिर परिसरातील वनराई क्षेत्रामध्ये लागवटीसाठी सामाजिक कार्यकर्ते , उदयोजक आदर्श उर्फ भाऊ मोरजकर यांनी पर्यावरण रक्षणासाठी फळे , फुले व सावली देणार-या विविध प्रकारची ५०० रोपे मोफत उपलब्ध करुन दिली. असलदे गावातील ५० ते ६० गावक-यांनी एकत्र येत श्री देव रामेश्वर मंदिर परिसरात सोमवारी ५०० रोपे लावून एक समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. यावेळी आदर्श उर्फ भाऊ मोरजकर यांनी पुढील ३ वर्षे वृक्ष लागवटीसाठी वृक्ष उपलब्ध करुन देण्याचा संकल्प केला आहे.

 असलदे येथील रामेश्वर मंदिर परिसरातील वनराईत आंबा , काजु , जांभुळ , पिंपळ ,      वड , सोनचाफा , शमी , फणस , बेल , बिबा अशा विविध प्रजातीच्या ५०० रोपांच्या लागवटीचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते , उदयोजक आदर्श उर्फ भाऊ मोरजकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपसरपंच सचिन परब , सोसायटी चेअरमन भगवान लोके, सोसायटी संचालक शामराव परब , उदय परब , शत्रुघ्न डामरे , तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे , ग्रामसेवक संजय तांबे , महादेव परब, मारुती घाडी , दिनेश शिंदे , ओमकार परब , विकास परब , दौलत परब , सदाशिव दाभोळकर , अजय परब , सुरज शिंदे , संतोष परब , मधुसुदन परब , प्रकाश वाळके , सुरेंद्र परब , मंगेश चव्हाण , विश्वनाथ परब , बापू परब , सुनिल परब , अनिल परब , मेहूल घाडी आदींसह गावकरी मंडळी मोठया संख्येने या वृक्ष लागवट मोहिमेत सहभागी झाले होते.

यावेळी आदर्श मोरजकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत वृक्ष लागवटीसाठी विविध प्रजातीची ५०० रोपे उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले.
You cannot copy content of this page