तळवणे वेळवेवाडी पुलाचा भराव खचला…

रस्त्याला धोका उद्भवण्याची शक्यता ; प्रशासनाने लक्ष द्यावे, प्रशांत कोरगावकर यांची मागणी..

⚡सावंतवाडी ता.३१-: तालुक्यातील तळवणे वेळवेवाडी पुलाच्या भरावाची माती खचल्याने रस्त्याला धोका निर्माण झाला आहे शिवाय येथे अपघाताची भीती निर्माण झाली आहे याबाबतची माहीती तेथील शिंदे शिवसेनेचे विभागप्रमुख प्रशांत कोरगावकर यांनी दिली असून प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष वेधावा अशी मागणी केली आहे.


तळवणे वेळवेवाडी पुल अलीकडेच नव्याने बांधण्यात आले आहे. या पुलासाठी ग्रामस्थांनी सतत पाठपुरावा प्रसंगी आंदोलन केले आहे. मात्र सतत पडलेल्या पावसामुळे पुण्याच्या सुरवातीला मुखावरील भागाला घातलेला मातीचा भराव खचल्याने येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. हा भराव खचल्याने रस्त्याला धोका उद्भभवण्याची शक्यता आहे. तरी वेळीच याकडे प्रशासनाने लक्ष वेधून डागडुजी करावी अशी मागणी श्री कोरगावकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page