महेंद्र सांगेलकर व ग्रामस्थांच्या सहकार्याने काम मार्गी
⚡सावंतवाडी ता.३१-: अतिवृष्टीमुळे सातत्याने पडझड होत असलेल्या घोलेवाडी पुलाची तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या सहकार्यातून आणि घोलेवाडी ग्रामस्थांच्या श्रमदानातून काँक्रिटीकरण करून दुरुस्ती करण्यात आली.
तालुक्यातील सांगेली घोलेवाडी येथील पुलावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे येथून वाहन चालवणे सोडा साधे चालता नाही कसरत करावी लागत होती त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. वेळोवेळी मागणी करूनही या पुलाकडे दुर्लक्ष झाल्याने आज काॅग्रेसचे तालुका सरचिटणीस श्री रुपेश आईर,श्री गुरुनाथ आईर यांच्या प्रयत्नातून या पुलासाठी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री सांगेलकर यांनी खड्डे बुजवण्यासाठी आवश्यक असलेले मटेरियल उपलब्ध करून दिले. तर सिमेंट जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री वामन नार्वेकर यांनी ग्रामस्थांना उपलब्ध करुन दिले. दरम्यान यातून पुलावरील खड्डे बुजवून ग्रामस्थांना होणारा त्रास काहीसा दूर करण्यात आला.
यावेळी सरपंच लवू भिंगारे, उपसरपंच संतोष नार्वेकर श्री बापू आईर,लक्ष्मण राऊळ, सुराज सावंत, मोतीराम सावंत, संतोष तावडे, विलास इळेकर,अशोक देसाई, मिथुन रेडीज, गुरु रेडीज, प्रकाश रेडीज, सचिन राणे, श्यामसुंदर (पिंटो) राऊळ तसेच बहुसंख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यास हातभार लावला.
