उद्धव ठाकरे वाढदिवसाचे औचित्य; रुपेश राऊळ यांचा पुढाकार..
आंबोली,ता.३१: शिवसेना उद्धव ठाकरे सेनेतर्फे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आंबोली आरोग्य केंद्रात औषधे आणि गोळ्यां वैद्यकीय अधिकारी डॉ.आदिती पाटकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.तसेच गेळे- भाळेभाटले,आंबोली कामतवाडी आणि गावठणवाडी येथे प्राथमिक शाळेतील मुलांना छत्र्या आणि शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले.तसेच आशांना देखील छत्री चे वाटप करण्यात आले..
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे यांनी प्रास्ताविक केले आणि उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.रुपेश राऊळ यांनीही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यानंतर येथील आरोग्य केंद्रात तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, माजी परिषद सदस्य रोहिणी गावडे,विभाग अध्यक्ष बबन गावडे, शबिर मनियार,संतोष पाताडे,अशोक परब,रमाकांत राऊळ, कलंबिस्त उपसरपंच राऊळ,उपतालुका संघटक उत्तम पारधी,डुबा राऊत,चौकुळ शाखा प्रमुख रुपेश गावडे,अरुण गावडे,आंबोली चे शिवसैनिक सत्यवान गावडे,शाखा प्रमुख बाळा कोरगावकर,ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत, अनिल चव्हाण,प्रकाश गुरव,सुनील राऊत, गोविंद जाधव,दादा कर्पे,सुनील चव्हाण,साक्षी राऊत,डुबा राऊत,देवसुचे गोविंद सावंत,गेळे चे मनोहर बंड,वाफोलिचे प्रशांत बुगडे,अशोक परब,गावठाणवाडी शंकर गावडे,रोहिणी गुरव,आशा स्वयंसेविका तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी आंबोली बाजारवाडी येथे कार्यरत आणि गावठाण येथील अंगणवाडी सेविका रूपा राऊत हीचा मुलगा विघ्नेश विष्णू परब वय २४(मूळ.रा.करिवडे) याचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला त्याचे सांत्वन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घरी जाऊन केले.
