Headlines

खर्डेकर महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा….

*💫वेंगुर्ला दि.०३-:* बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील इंग्रजी विभागामार्फत इंग्रजी विषयाच्या २०१५ ते २०२० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या यशामध्ये व प्रगतीमध्ये मौलिक यगदान दिले, असे मत प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला नॅक समन्वयक प्रा. डी. बी. राणे, सदस्य प्रा. बी. एम.भैरट व रसायनशास्त्र विभाग प्रमुख एस. एस. चमणकर यांच्यासह अनुराधा परब, कुंदा घोगळे, पूजा सावंत, सारिका किनळेकर, निकिता राऊत, अंकिता नवार, प्रथमेश राणे, समिधा गोलतकर, चारुशिला तुळसकर, जिद्धी जाधव, तुषार पेडणेकर, गौरव शिरोडकर, सायली जाधव, संदेश जाधव, प्रणाली घारे आणि करुणा वेंगुर्लेकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभागप्रमुख डॉ.मनिषा मुजुमदार यांनी तर सूत्रसंचालन डॉ. बी. जी. गायकवाड यांनी केले

You cannot copy content of this page