*💫वेंगुर्ला दि ०३-:* खवणे येथील प. पू. नामदेव महाराज मठात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धेत ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ भेंडमाळा या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. प. पू.नामदेव महाराज मूर्ती प्रतिष्ठपना दिनाच्या निमित्ताने खवणे येथील मठात दोन दिवसीय ही जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचा शुभारंभ माजी पंचायत समिती सदस्य पुरुषोत्तम परब यांच्या हस्ते झाला. यावेळी वसंत तांडेल, बाबाजी परब, रमेश मोंडकर, विजय राऊळ, संजय परब, इच्छाराम केळुसकर, गोविंद मसुरकर, अरुण सारंग आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील द्वितीय क्रमांक अचानक भजन मंडळ वेंगुर्ला यांनी तृतीय क्रमांक महापुरुष भजन मंडळ निवती-मेढा यांनी तर उत्तेजनार्थ बक्षीस धावडेश्वर मुळपुरुष भजन मंडळ वेंगुर्ला यांना देण्यात आले. स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट गायक प्रतीक गिरप, उत्कृष्ट पखवाज वादक दर्शन नर्से, तर उत्कृष्ट कोरस म्हणून केपादेवी भजन मंडळ मुठ यांना निवडण्यात आले. सर्व विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुरेंद्र केळुसकर (वेंगुर्ला), व अवधुत खडपकर (कवठी-चेंदवण) यांनी काम पाहिले. स्पर्धेला विशेष मार्गदर्शक म्हणुन आपा ताम्हणकर, केळुस हे लाभले होते.
खवणे येथील जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत ब्राह्मण मंडळ भेंडमळा प्रथम…
