*💫वेंगुर्ला दि.०३-:* सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक पुष्कराज कोले यांनी मठ येथील डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच पाच विद्यार्थ्यांना गणवेशासाठी रोख ३५०० रुपये शाळेचे मुख्याध्यापक एस. ए. जाधव यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी नूतन मराठा हितवर्धक मंडळ मुंबईचे गिरीश पोईपकर, एस. एस. गिरप, शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्ष मानसी भगत, नूतन मराठा हितवर्धक मंडळ ग्राम समितीचे सदस्य वसंत परुळेकर तसेच पालक-शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कोविड-१९च्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी कार्य केलेल्या मठ ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी दिनेश परब, कर्मचाऱ्यांमधून दिगंबर पांडुरंग मोबारकर व विद्यार्थ्यांमधून कु. समर्थ बोवलेकर, कु. सुधीर परब, कु.साहिल बोवलेकर, कु.श्रीनेश बोवलेकर यांचाही सत्कार करण्यात आले. आभार टी. टी. खानोलकर यांनी मानले.
पुष्कराज कोले यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप….
