असलदे रामेश्वर मंदीर रस्त्यासाठी १ कोटी ४९ लाखांचा निधी

ना. रविंद्र चव्हाण,आ.नितेश राणेंच्या माध्यमातून निधी ; सरपंचानी मानले आभार

⚡कणकवली ता.३०-: कणकवली तालुक्यातील असलदे रामेश्वर मंदीर रस्ता ग्रा.मा.क्र. ९३ कि.मी. ०/०० ते १/५०० मध्ये मजबुतीकरण करणे या रस्त्यासाठी १ कोटी ४८ लाख ३२ हजार ७५१ रुपये निधी मंजूर झाला आहे.या कामाची निविदा प्रक्रिया सुरु आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ही निविदा जाहीर करण्यात आली आहे.या रस्त्याचे काम पालकमंत्री रविंद्र चव्हाण,आ.नितेश राणेंच्या माध्यमातून निधी मंजूर झाला आहे.त्याबद्दल असलदे सरपंच चंद्रकांत डामरे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपा आमदार नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.
असलदे रामेश्वर मंदीर रस्ता व्हावा यासाठी ग्रामस्थांची मागणी होती आ.नितेश राणेंकडे मागणी केली होती.त्या मागणीनुसार आ.नितेश राणेंनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला.त्या रस्त्यासाठी १ कोटी ४८ लाख ३२ हजार ७५१ रुपये मंजूर झाला आहे.त्यामुळे हा रस्ता निविदा प्रक्रिया होताच काम सुरु करण्यात येईल

You cannot copy content of this page