झरेबाबंर पंचायत समिती मतदारसंघात खत वाटप

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

⚡दोडामार्ग ता.३०-: माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातील झरेबाबंर पंचायत समिती मतदारसंघात खत वाटप करण्यात आले. पिकुळे, सोनवल,उसप,खोकल, झरेबाबंर या पाच गावात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सावंतवाडी मतदारसंघाचे संपर्क प्रमुख शैलेश परब यांच्या माध्यमातून खत वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ व कार्यकत्यांशी विविध विषयांवर चर्चा करून मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, उपजिल्हा प्रमुख बाबूराव धुरी, तालुका प्रमुख संजय गवस, महिला आघाडी उप जिल्हाप्रमुख विनिता घाडी,तालुका प्रमुख श्रेयाली गवस, संपदा देसाई, लक्ष्मण आयनोडकर, विजय जाधव, मिलिंद नाईक, मदन राणे, संतोष मोर्यें ,दशरथ मोरजकर सज्जन धाऊसकर, संदेश राणे, संदेश वरक शिवराम मोर्लेकर, रुपेश गवस, गौरवी नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते..

You cannot copy content of this page