Headlines

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण

⚡वेंगुर्ला ता.३०-: ‘सारथी‘ या संस्थेमार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मराठा, कुणबी, कुणबी मराठा, व मराठी कुणबी या लक्षित गटाच्या १८ ते ४५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी वेंगुर्ला येथील ‘हायटेक कॉम्प्युटर‘ या एमकेसीएलच्या अधिकृत अध्ययन केंद्रावर मोफत संगणक व व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.


या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश, आयटी स्किल्स हे दोन अभ्यासक्रम शिकविले जाणार असून इतर विद्यार्थ्यांनी दोन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी निवडायचे आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असलेले स्किल्स शिकता येतील व स्वतःचया पायावर उभे राहता येईल. या प्रशिक्षणाविषयी संपूर्ण माहिती घेण्यासाठी व अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी हायटेक कॉम्प्युटर येथे भेट द्यावी असे आवाहन हायटेक कॉम्प्युटरच्या संचालिका प्रणाली अंधारी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page