अन्यथा वृक्षारोपण करण्याचा रज्जाक बटवाले यांचा इशारा
⚡कणकवली ता.३०-: नांदगाव तिठा फोंडा रोड रज्जाक बटवाले यांच्या घराजवळ रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत त्या मुळे येथे अपघात होऊ शकतो व या खड्ड्यांमुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे हे खड्डे न बुजविल्यास येथे वॄक्षारोपन करणार असल्याचा इशारा नांदगाव तंटामुक्त समिती अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी दिला आहे.
याबाबतचे लेखी निवेदन उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली अधिकारी श्रीमती के. के. प्रभू यांना तंटामुक्त समिती अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी दिले आहे
नांदगाव बाजारपेठ एक भलेमोठे वॄक्ष पुर्ण पणे वाकलेले आहे ते कधी कोसळेल सांगता येत नाही येथे शासकीय कार्यालये आहेत व रहदारी भरपूर आहे शाळेचे विद्यार्थी या रस्त्यावर येत आहे. तेव्हा हे भलेमोठे झाड त्वरित हटवावे. दुर्घटना होऊ नये म्हणून त्वरित उपाययोजना करावी व खड्डे बुजवावेत व बाजारपेठ येथील वॄक्ष यांचा बंदोबस्त करावे असे लेखी निवेदन उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली अधिकारी श्रीमती के. के. प्रभू यांना तंटामुक्त समिती अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी दिले आहे
