⚡कणकवली ता.३०-: पावसाळी अधिवेशनामध्ये ठाकर समाजाचा प्रश्न लावून धरल्याबद्दल व त्या अधिकाऱ्यावर कारवाई होण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाच्यावतीने आमदार नितेश राणे यांची भेट घेत आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे अध्यक्ष भगवान रणसिंग, सचिव दिलीप म्हस्के, कार्याध्यक्ष निलेश ठाकूर, मालवण तालुका अध्यक्ष रुपेश गरुड, कणकवली तालुका अध्यक्ष वैभव ठाकूर, जिल्हा सदस्य राजन रणसिंग, साई यादव, सुनील ठाकूर, समीर ठाकूर, सचिन ठाकूर, अच्युत मस्के, विठ्ठल सिंगनाथ, सुधीर गंगावणे, अमित ठाकूर सचिदानंद ठाकूर, प्रशांत मराठे, सुहास ठाकूर, अविनाश ठाकूर, धनंजय ठाकूर,उमेश ठाकूर, अविराज मराठे आदी उपस्थित होते.
