पिंगुळी गुढीपूर येथे कारच्या धडकेत दहा वर्षाच्या मुलाचे मृत्यू..

मुंबई गोवा महामार्गावरील घटना; पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

⚡कुडाळ, ता.३०-: मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी गुढीपूर येथे आज सकाळी ७.३० च्या सुमारास कारने सायकलस्वार मुलास ठोकरल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मृत झालेल्या मुलाचे नाव विराज निलेश तेली (वय, १० वर्षे, मूळ बोर्डवे-कणकवली, सध्या राहणार : पिंगुळी – गुढीपूर) असे आहे.

प्राप्त माहितीनुसार, दोडामार्ग येथून राजू वासू गवस हे
कार (एम एच ०७ ए बी : ०११५) घेऊन ओरोस येथे जात होते. त्यावेळी पिंगुळी गुढीपूर येथे रस्त्यावर सायकल घेऊन आलेल्या विराजला कारची धडक बसली. या धडकेत विरजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. या घटनेची तक्रार निलेश सत्यवान तेली यांनी कुडाळ पोलिस स्थानकात दिली आहे.

You cannot copy content of this page