त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत करा किंवा अतिरिक्त निधी द्या

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी*

*💫कणकवली दि.०३-:* मुंबई गोवा महामार्गाच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या महामार्गाला संपादित झालेल्या जागा चक्काजाम पूर्ण झाल्यामुळे भविष्यात खरेदी करणाऱ्या खरीददाराची फसवणूक होऊ शकते असे मत उपरकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. त्यामुळे ज्यांच्या जमिनी जास्त गेल्या आहेत. त्यांना एकतर त्यांच्या जमिनी परत करा किंवा त्यांना अतिरिक्त निधी द्यावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच या संबंधी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावावी अशी मागणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page