देवगड व वेंगुर्ला बस स्थानकाचे रूपडे पालटणार

नुतनीकरणाकरिता दोन कोटीची प्रशासकीय मंजुरी

⚡कणकवली ता.२८-: राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातील देवगड व वेंगुर्ला बसस्थानक नुतनीकरणाकरिता प्रत्येकी दोन कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी प्राप्त झालेली असून लवकरच या दोन्ही बसस्थानकांस शासकीय निधीमधून नुतनीकरण करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांनी दिली.

सिंधुदुर्ग विभागातून देवगड व वेंगुर्ला या बसस्थानकांची बांधणी ही अनुक्रमे सन १९७५-७६ व १९८९-९० साली बांधण्यात आली असून सततच्या पावसामुळे या बसस्थानकांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली होती. गतवर्षी या दोन्ही बसस्थानकांचे मे. अरीन डिझाईन पुणे या खाजगी कंपनीकडून स्टक्चरल ऑडीट करुन घेण्यात आलेले होते.

सद्यस्थितीत या दोन्ही बसस्थानकांच्या कामाच्या नुतनीकरणाकरिता रु. २ कोटी इतक्या निधीची प्रशासकीय मंजुरी झालेली असून निविदा प्रक्रिया राबवून लवकरात लवकर कामास सुरुवात केली जाणार आहे.असे
विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page