⚡सावंतवाडी ता.२७-: शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ मध्ये ठाकरे गटाच्या शहर संघटक श्रुतिका दळवी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सावंतवाडी तालुका संघटक नम्रता झारापकर, भारती कासार, सावंतवाडी शहर संघटक श्रुतिका दळवी, सावंतवाडी युवतीसेना शहर संघटक प्रिया नेहवाल, नमिता सावंत, यशोदा परब, संगीता मुळीक, श्रेया कासार, समीरा खलील, प्रगती बामणे, नंदा सावंत, कल्पना नाटेकर, संगीता पेडणेकर, मनाली परब, फलकारा शेख, सीता कासार आदी उपस्थित होते.
