पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्या

आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार : रोटरी वैभववाडी क्लबचा एमसीएच संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम

वैभववाडी प्रतिनिधी
रोटरी इंटरनॅशनल नियोजित वेळापत्रक प्रमाणे रोटरी वैभववाडी क्लब चा प्रोग्राम (MCH संदर्भात )Maternal and child health या संदर्भातील मार्गदर्शन व गरजेचा सकस पोषक आहार आणि शिवाय सहा महिन्यांच्या आत बालकांना छोटीशी भेट वस्तू व त्यावरील बालकांना नाचणी सत्व भेट स्वरूपात देऊन पावसाळ्यात आरोग्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी या बद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनिल पवार यांनी मार्गदर्शन केले.


‌ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आचिर्णे उपकेद्राचे कर्मचारी यांनी खूप मदत केली त्यात स्टाफ नर्स नीलम कदम, आशा सेविका, आरोग्य सेवक, यांनी सहकार्य केले. शिवाय माता व बालके यांच्या शिवाय परिवारातील सदस्य आणि गरोदर माता व काही ग्रामस्थांनी आपली उपस्थिती होते. यावेळी रोटे अध्यक्ष संजय रावराणे, रोटे सचिव प्रशांत गुळेकर, रोटे चार्टर प्रेसिडेंट संतोष टक्के, रोटे गवळी सर, रोटे मंगेश कदम, रोटे सलोनी टक्के, रोटे स्नेहल खांबल, रोटे सचिन रावराणे, रोटे मुकुंद रावराणे, यांची आदी उपस्थिती होते.

You cannot copy content of this page