वैभववाडी प्रतिनिधी
तालुक्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर पुन्हा वाढला.मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक घर, गोठा व गडग्याची पडझड होऊन अंदाजे 172500 रु नुकसान झाले आहे.
तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे.बुधवारी रात्री पावसाचा जोर पुन्हा वाढला.या पावसाने तालुक्यातील कोकीसरे संतोष सहदेव पवार चिरेबंदी गडगा पडून 80,000 हजार,नाधवडे अशोक वासुदेव गिते गोठा 12000 हजार,अचिर्णे जयवंत रावराणे घर 70,000 हजार,तर उंबर्डे,दोन घरांचे 10500 रु किरकोळ नुकसान झाले आहे.भुईबावडा घाटात सकाळी दरड कोसळली होती सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दरड हटवू मार्ग मोकळा केला.करुळ घाट सुरळीत आहे.परंतु कोल्हापुर मार्गावरील मांडुकली,लोंघे येथे पाणी असल्याने वैभववाडी कोल्हापूर वाहतूक ठप्प आहे.
