सावंतवाडी आणि कुडाळ येथील वंचित पुर नुकसानग्रस्तांसाठी २ कोटी २५ लाख…

दिपक केसरकर ; पाण्यात उतरण्याचे धाडस करु नका..

⚡सावंतवाडी ता.२७-: तालुक्यात दोन वर्षांपूर्वी आलेल्या तेरेखोल नदीच्या पुरातील वंचित नुकसानग्रस्तांना नव्याने शासन स्तरावरून दोन कोटी 25 लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून तो लवकरच संबंधित नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा केला जाईल यामध्ये सावंतवाडी तालुक्यासाठी दोन कोटी तर उर्वरित 25 लाख निधी कुडाळ तालुक्यासाठी देण्यात आला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे सांगितले.


तर जिल्ह्यात पूर परिस्थिती काहीशी ओसरली असली तरी कुणीही पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये ज्या लोकांना पुरस्थितीत जीव गमवावा लागला त्यांना आवश्यक ती मदत शासनाकडून देण्यात आली असून तब्बल 370 हेक्टर शेतीच्या नुकसानीचे पंचनामे ही युद्ध पातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री केसरकर यांनी आज येथील नगरपालिका सभागृहात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आपत्कालीन व सिंधू रत्न संदर्भात बैठक घेतली बोलावली होती या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वरील माहिती दिली.

You cannot copy content of this page