रज्जाक बटवाले यांनी गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांना निवेदन.
⚡कणकवली ता.२७-: नांदगाव जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळेमध्ये शिक्षक भरती न केल्यास शाळा बंद आंदोलन करण्यात येईल असे नांदगाव शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांना लेखी निवेदन देण्यात आले.
नांदगाव जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळेमध्ये ५ शिक्षक मंजूर असते वेळी २ शिक्षक कार्यरत आहे मुलांची १ ते ७ वी पर्यंत ७८ पटसंख्या आहे आम्ही वेळोवेळी सहकार्य केले परंतु आम्हाला शिक्षण विभाग येथून काहीच उत्तर मिळाले नाही उलट आज उद्या असे आश्वासन मिळाले आहे आम्हाला निवॄत शिक्षक नको आहे. त्याऐवजी डीएड ,बीएड पदवीधर बेरोजगार शिक्षकांची भरती करण्यात यावी व हे शिक्षण आम्हाला द्यावे. निवॄत शिक्षक आम्ही स्वीकारणार नाही जर आम्हाला शिक्षक लवकर उपलब्ध झाले नाही तर आम्ही शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ विद्यार्थी यांना सोबत घेऊन शाळा बंद आंदोलन सुरू करू असे नांदगाव शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी लेखी निवेदन कणकवली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किशोर गवस साहेब यांना देण्यात आले व यांची पुर्ण जबाबदारी शिक्षण विभाग यांच्यावर राहील असे म्हटले आहे.
