शिक्षण मंत्र्यांच्या घरच्या शाळेतच पुस्तकांचे शॉर्टेज…

रुपेश राऊळ ; केसरकरांना अधिकारी जुमानत नसल्याचे पुन्हा सिध्द..

⚡सावंतवाडी ता.२७-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शहरातीलच शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तके शॉर्टेज असून तालुक्यातील तब्बल 22 शाळेमध्ये असा प्रकार आढळून आला असून शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघातच शिक्षणाचे 12 वाजल्याचे टीका पुन्हा एकदा ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केली.


तर ज्या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नाहीत अशांना उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर पुस्तके वाटप करून सामाजिक जबाबदारी आम्ही पार पडली यामध्ये कुठलाही राजकीय हेतू नाही परंतु शिक्षण मंत्र्याच्या घरच्या शाळेत पुस्तके वाटण्याची पाळी आमच्यावर येत असेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय अशीही टिका त्यांनी केली.
श्री. राऊळ यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, गुणाजी गावडे, योगेश नाईक, सुनील गावडे, महेश गावडे, अनुप नाईक आदी उपस्थित होते. श्री राऊळ म्हणाले, या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या मतदार संघात सावंतवाडी तालुक्यात तब्बल २२ शाळातील मुलांना पुस्तके शॉर्टेज आहेत. तर दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा आहे या दोन्ही गोष्टीकडे स्थानिक आमदार व मंत्रिमंडळ केसरकर यांचा दुर्लक्ष आहे त्यामुळे कुठलाही राजकीय हेतू न ठेवता सामाजिक जबाबदारीच्या जाणीव येतो दोन्ही विभागातील तुटवडा भरून काढण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आला तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र औषधांचा पुरवठा करण्यात येणार आहे निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातून याची सुरुवात झाली आहे तर मंत्री केसरकर यांच्या शहरातील शाळेतून विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्याची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे सरसकट मुलांना मोफत पुस्तके देण्यात आल्याचे सांगणारे केसरकर यामुळे उघडे पडले आहे.
तिमाही परिक्षा वीस दिवसांवर येऊन ठेवलेली असताना मुलांकडे पुस्तकच नाही तर शिक्षण मंत्री म्हणून केसरकर करतात काय हा प्रश्न आहे.
ते पुढे म्हणाले, सावंतवाडी मतदारसंघातील एकूणच ही परिस्थिती पाहता त्यांचा प्रशासनावर वचक नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे पालकमंत्री असताना अधिकारी जोमानत नव्हते परंतु आता कॅबिनेट मंत्री असूनही जर अधिकारी जुमानत नसतील तर केसरकर मंत्रिमंडळ फेल ठरले आहेत. एकीकडे केसरकर सर्व विद्यार्थ्यांपर्यंत मोफत पुस्तके पोहचल्याचे सांगत असतील तर त्यांना नक्कीच अधिकारी चुकीची माहिती देत असणार जर पुस्तके पोहचली असती तर आम्हाला पुस्तके वाटण्याची वेळ आली नसती. शिक्षणाधिकारी जर केसरकरांना चुकीची माहिती देत असतील तर याबाबत त्यांनी चौकशी करणे गरजेचे आहे. तर तालुक्यातील आरोग्य केंद्रात आज औषध उपलब्ध नाहीत ही वस्तुस्थिती आहे. हे लक्षात आल्यानंतर आम्ही औषध पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. काल निरवडे ग्रामपंचायत पासून त्याची सुरुवात करण्यात आली. आता बांदा, मळेवाड, सांगेली, आंबोली या गावांना सुद्धा औषध पुरवठा करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page