बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे उचलले पाऊल : सरपंच प्रवीण पंडित..
⚡बांदा ता.२७-: वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने कास-शेर्ले रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी हटविण्याकडे दुर्लक्ष केला. समोरून येणारी वाहने रस्त्यावर आलेल्या झुडपांमुळे दिसत नव्हती. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी कास-शेर्ले मार्गावरील सात किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा असलेली झुडपे स्वखर्चातून हलविली असे कास सरपंच प्रवीण पंडित यांनी सांगितले.
शेर्ले-कास रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी वाढली होती. रस्ता वाहतुकीला धोकादायक बनला होता. तसेच झाडे विद्युत वाहिन्यांवर आल्याने विद्युत पुरवठ्यावरही परिणाम होत असे. सर्व परिस्थिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देखिल अधिकारी याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी स्वखर्चातून जेसीबीच्या साहाय्याने सुमारे सात किलोमीटर रस्त्याच्या बाजूला आलेली झाडी हटविल्याचे सरपंच प्रवीण पंडित यांनी सांगितले.
दरम्यान, कास गावात प्रथमच रस्त्याची सफाई करण्यात आली. सरपंच प्रवीण पंडित हे सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या समस्या स्वतः पुढाकार घेऊन मार्गी लावण्यासाठी धडपड करत असतात आणि आज केलेले कार्य कौतुकास्पद असे सांगत ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
