उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या औचित्य: माजी खासदार निलेश राणे यांचा पुढाकार..
⚡मालवण ता.२४-: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिनाचे औचित्य साधून भाजपा मालवणच्यावतीने मालवण कुडाळ विधानसभा संयोजक आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या सहयोगाने मालवण शहरातील ५० सफाई कामगाराना पावसाळ्यासाठी आवश्यक असणारा रेनकोट वाटप करण्यात आले.
ना. देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस गोरगरीब जनतेची सेवा करून करावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते .या अनुसरूनच रेनकोट वाटप करण्यात आले. तसेच सफाई कामगारांचे असणारे प्रश्नासाठी व ठेकेदार ठेक्यायामध्ये नमूद केल्याप्रमाणे वेतन देत नसल्याबाबत माजी खासदार निलेश राणे तसेच मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठेकेदार आणि कामगार यांची संयुक्त बैठक घेऊन यासंदर्भात तोडगा काढण्यात येईल अशी ग्वाही यावेळी कामगारांना देण्यात आले. लवकरच सर्व सफाई कामगारांची आरोग्य तपासणी व स्किन स्पेशालिस्ट कडून भाजपातर्फे तपासणी करून घेण्यात येणार आहे .
यावेळी भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर ,सुदेश आचरेकर ,बाबा परब ,दीपक पाटकर ,गणेश कुशे , आप्पा लुडूबे ,सौ पूजा करलकर , ललित चव्हाण ,आंबा हडकर ,हरेश गावकर ,कमलेश कोचरेकर ,भाई मांजरेकर ,मोहन वराडकर, मंदार लुडबे, विक्रांन्त नाईक उपस्थित होते .