मणेरी शाळेचे छप्पर अंशत: कोसळले

⚡दोडामार्ग,ता.२४-:
मणेरी शाळा क्रमांक एकचे छप्पर सोमवारी दुपारी मुसळधार पावसामुळे अंशत: कोसळले. इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थी संगणक कक्षात गेले होते.त्याचवेळी छपराचा मोठा वासा वर्गात कोसळला.त्यासोबत काही कौलेही पडली.सुदैवाने त्यावेळी विद्यार्थी वर्गात नव्हते अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.त्यानंतर तत्काळ शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून बैठक घेतली.शाळेचे संपूर्ण छप्परच धोकादायक झाले आहे.कौले फुटून पाणी गळते आहे.छपराचे लाकूड जीर्ण व धोकादायक झाले आहे.त्यामुळे तत्काळ इमारत निर्लेखित करून छपरासह स्वतंत्र नवी इमारत बांधून द्यावी असा ठराव केला. युवासेनेचे तालुका प्रमुख भगवान गवस,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय कुबल,अनुजा सावंत,सुविधा धुमास्कर व अन्य सदस्य,ग्रामस्थांनी धोकादायक छपराची पाहणी केली.

You cannot copy content of this page