स्कॉलरशिप परीक्षेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश

⚡सावंतवाडी ता.२४सहदेव राऊळ -: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित स्कॉलरशिप परीक्षा-२०२२-२३ परीक्षेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्यावतीने घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे- पूर्व माध्यमिक स्कॉलरशिप इयत्ता आठवी) स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी- कुमारी निधी चंद्रकांत राऊळ, कुमारी मृण्मयी अनिल नाईक तर पूर्व उच्च प्राथमिक स्तरावर (इयत्ता पाचवी ) स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी- कुमार विवेक ज्ञानेश्वर गेळे, कुमारी वेदा दत्तगुरू कांबळी यांनी उज्ज्वल यश प्राप्त केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पालक – शिक्षक – मुख्याध्यापक यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.

You cannot copy content of this page