⚡सावंतवाडी ता.२४-: मिलाग्रीस हायस्कूल च्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
सुरुवातीला प्रशालेच्या शिक्षिका सौ.जेनेट आल्मेडा यांनी परमेश्वराजवळ त्यांच्या दीर्घायुष्यासाठी व त्या करत असलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी प्रार्थना केली.प्रत्येक वर्गाच्या वर्गप्रतिनीधींनी शुभेच्छापत्रे देऊन सिस्टरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.नंतर मुलांनी शाळेचे संगीत शिक्षक श्री स्वप्नील गोरे व श्री अमोल राऊळ यांच्यासमवेत वाढदिवस गीत सादर केले.प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी व्यवस्थापनाच्या वतीने पुष्पगुच्छ व फोटोफ्रेम
देऊन सिस्टरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.व आपल्या मनोगतात त्यांनी सिस्टरांची कर्तव्यदक्षता व कामातील नीटनेटकेपणा सांगितला.व सिस्टरांना त्यांच्या कामात सदैव यश मिळो अशी प्रार्थना केली.
प्रशालेच्या शिक्षिका श्रीमती मारिया फर्नांडिस यांनी सिस्टरांच्या प्रेमळ व सर्वांना समजुन घेण्याच्या वृत्ती बद्दल आपल्या मनोगतात व्यक्त केले.वेळप्रसंगी कठोर होण्याच्या व प्रत्येकाला त्याच्या क्षमतेप्रमाणे काम देण्याच्या पद्धतीचा उल्लेख केला.कार्यक्रमाचे आभार प्रशालेच्या शिक्षिका सौ.रूफिना डान्टस यांनी मानले.