आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचा वापर करून राजकारण करणे चुकीचे

आम. वैभव नाईक:आम. राणें हे आप्पासाहेबांच्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत..

⚡कणकवली ता.२४-: महाराष्ट्र भूषण निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन आमदार नितेश राणे करीत आहेत. महाराष्ट्र भूषण निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी व श्री सदस्य आणि राजकारण या वेगवेगळ्या गोष्टी असून आमदार नितेश राणे हे नेहमीच मतांच्या राजकारणासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असतात. निश्चितच विधानसभेमधील कामकाजाबाबत आमदार नितेश राणे चुकीची माहिती प्रसिद्ध करीत असल्याबाबत विधानसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी आणि श्री सदस्यांबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व पक्षातील सर्वच आमदार यांच्या मनात नेहमीच आदराची भावना राहिली आहे. विधानसभेमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमाबाबत उपस्थित प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कोणत्याच आमदारांनी सहभाग घेतला नाही. सदर चर्चेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कोणत्याही आमदारांनी सहभाग घेतला नव्हता आणि याचे रेकॉर्ड देखील विधानसभेमध्ये उपलब्ध आहे असे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page