आढावा बैठक केवळ सूचना देण्याचे केले काम:ठाकरे शिवसेनेच्या रुपेश राऊळ यांचा आरोप
⚡सावंतवाडी ता.२४-: केसरकारांचा कालचा दौरा हा निवळ दिखाऊपानाच आहे. अधिकाऱ्यांना सूचना करतानाच तात्काळ पंचनामे होणे आणि मुख्यमंत्र्यांकडून निधी उपलब्ध करून देणे हे केसरकारांचे काम आहे परंतु केसरकर तस न करता फक्त सूचना करण्याचे काम केले अशी टीका तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केली.
दरम्यान मी केलेल्या सूचनांच पालन केसरकारांनी काल केले परंतु आता साथीचे रोग लक्षात घेता आरोग्याची बैठकीही त्यांनी घ्यावी अशी ही मागणी राऊळ यांनी यावेळी केली आहे. ते सावंतवाडी येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते
यावेळी राऊळ पुढे बोलताना म्हणाले की केसरकारांनी आजपर्यंत एवढा बैठका घेतला व त्या बैठकीतून एखादा निर्णय घेतला तो निर्णय एखादी पूर्ण करून दाखवला असं कधीच झालं नाही त्यामुळे कालच्या बैठकीत देखील तसेच झाले असून प्रशासनाला फक्त त्यांनी सूचना करण्याचे काम केले असा टोला देखील राऊळ यांनी यावेळी लगावला.
दरम्यान केसरकर हे आमदार मंत्री झाले परंतु त्याचा फायदा आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांना कसा होईल ज्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले याचा फायदा कसा होईल हे बघितले पाहिजे असताना मात्र त्या मंत्रीपदाचा फायदा मात्र या मतदारसंघातील जनतेला होताना दिसत नसल्याचाही राऊळ यावेळी म्हणाले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार शहर प्रमुख शब्बीर मणियार, आदी उपस्थित होते.