अनोख्या पद्धतीने व्यक्त केला ठेकेदार व प्रशासनाबाबत संताप
⚡सावंतवाडी ता.२३-: मळगाव ते वेत्ये मुख्य रस्ता (देवण सर) यांच्या घराशेजारी मोठा खड्डा पडून वाहनधारकांना पाण्यात याचा अंदाज येत नसल्याने गाड्या घासून मोठ्या प्रमाणत आर्थिक नुकसान होत आहे. वारंवार सूचना करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने तसेच वाहन चालक व पादचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत गुरुनाथ गावकर व मळगाव ग्रामस्थ यांनी आज कागदी होड्या सोडून तसेच खड्ड्यामध्ये झाडे लावून अनोख्या पद्धतीने ठेकेदार व संबंधित प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला आहे.
यावेळी बाप्पा नाटेकर, पांडुरंग रावूळ, सिद्धयेश तेंडोलकर, देवन सर, उदय सावल, शंकर सावंत, रुपेश सावंत उपस्थित होते.