सुरेश शिरोडकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान…

*💫वेंगुर्ला दि.०२-:* तालुक्यातील आसोली हायस्कूलचे निवृत्त शिक्षक सुरेश शिरोडकर यांना शिक्षक भारतीचा ‘‘जीवन गौरव पुरस्कार‘‘ प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार मुख्याध्यापिका विशाखा वेंगुर्लेकर यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी सदानंद गावडे, माजी मुख्याध्यापिका सीमा सावंत, शिक्षक विष्णू रेडकर, विजय धुरी, संजय धुरी, पांडुरंग म्हापणकर आदींसह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या दक्षता घेऊन प्रशालेतच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

You cannot copy content of this page