*💫वेंगुर्ला दि.०२-:* बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे मुख्य लिपिक अशोक सावळे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सपत्नीक प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. आनंद बांदेकर, प्रा. बी. बी. जाधव, प्रा. सूर्यवंशी, प्रा. डॉ. संजय गावडे, प्रा. जे. वाय. नाईक, प्रा. भेंडवडे, प्रा. डॉ. गायकवाड, प्रा. दिलीप शितोळे, प्रा. वामन गावडे, चंद्रशेखर माडकर, संजय पाटील, विधाता सावंत आदी उपस्थित होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी प्रा.डॉ.मंजिरी देसाई-मोरे यांनी संस्थेत सेवा करण्याची संधी उपलब्ध करुन दिली याबद्दल श्री.सावळे यांनी ऋण व्यक्त केले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. आनंद बांदेकर यांनी केले.
बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे लिपिक अशोक सावळे सेवानिवृत्त…
