*💫सावंतवाडी दि०२-:* कोलगाव, कुणकेरी आणि आंबेगाव रस्त्याचे अर्धवट राहिलेले डांबरीकरणाचे काम २० मार्च पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्या नंतर अखेर कुणकेरी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे. पंचायत समिती माजी सभापती प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण ग्रामस्थांनी सुरू केले होते.
२० मार्च पूर्वी रस्ता पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर अखेर त्या ग्रामस्थांचे उपोषण मागे
