‘त्या’ जिलेटीनचा स्फोट दगडाच्या खाणीवरच; परंतु वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न – प्रवीण गवस…

घटनास्थळ बदलल्यास गप्प बसणार नाही_

*💫दोडामार्ग दि.०२ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात उत्खनन मोठया प्रमाणात व अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू आहे. त्यातच काळ्या दगडाच्या खाणी बेकायदेशीर रित्या सुरू असून महसूल विभागाचे मात्र याकडे दुर्लक्षच दिसत आहे, काल एका काळ्या दगडाच्या खाणीवर जिलेटिनचा स्फोट होऊन दोन परप्रांतीय कामगारांना इजा झाल्याचा संशय असून त्यांना दवाखान्यात न आणता मणेरी येथे रस्त्याच्या कडेला फेकून दिले. हा प्रकार निंदनीय व माणुसकीला काळिमा फासणारा आहे.हा सगळा खटाटोप खाण मालकानेच केल्याचा संशय असून यावर सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी दोडामार्ग भाजपा तर्फे करण्यात येत आहे. ”त्या” जिलेटीनचा स्फोट हा काळ्या दगडाच्या खाणी वरच झालेला असून ह्या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न चालू आहे संबंधित मालकाने प्रशासनावर दबाव आणत घटनास्थळ बदलल्यास गप्प बसणार नाही तसेच जोपर्यंत दोषींवर कारवाही होत नाही तो पर्यंत एकही काळ्या दगडाची खाण चालू देणार नाही असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष प्रवीण गवस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.

You cannot copy content of this page