*आश्वासन देऊनही “त्या” रस्त्याचे काम सुरू न केल्याने कुणकेरी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

*सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर सुरू करण्यात आले उपोषण*

*💫सावंतवाडी दि.०२-:* कोलगाव, कुणकेरी आणि आंबेगाव रस्त्याचे गेल्या १७ महिन्या पासून वर्क ऑर्डर होऊन देखील अर्धवट डांबरीकरणाचे काम केले आहे. या रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता येथे अपघात होण्याची शक्यता आहे. या पूर्वी बांधकाम विभागास उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु बांधकाम विभागाने दिलेल्या लेखी आश्वासन अंती ते उपोषण स्थगित करण्यात आले होते. परंतु आज पर्यंत सदर काम सुरू न केल्याने कुणकेरी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आज उपोषण सुरू केले आहे.

You cannot copy content of this page