प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी:अद्याप प्रशासन न फिरकल्यामुळे आकलेकर परिवाराने व्यक्त केली नाराजी
⚡कुडाळ ता.२१-: कुडाळ तालुक्यातील वालावल- हुमरमळा येथील कमळेवाडी येथे मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे भालचंद्र आप्पा आकलेकर यांच्या घराला तडे जाऊन भिंत कोसळली आहे. तरी याची प्रशासन अद्याप गंभीर दखल का घेत नाही असा सवाल आकलेकर परिवाराकडून केला जात आहे.
हा प्रकार घडून कित्येक तास उलटले तरी अद्याप प्रशासनाचा एकही कर्मचारी घटनास्थळी न दाखल झाल्यामुळे आकलेकर परिवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तरी याची लवकरात लवकर प्रशासनाने दखल घ्यावी.
आकलेकर परिवाराला ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, प्रसाद प्रभू, सुनील करवडकर, गोविंद पेडणेकर आणि नेरूर ग्रामपंचायत सदस्य संतोष कुडाळकर उपस्थित होते.
