वालावल बंगेवाडीमध्ये दरड कोसळून घराला तडे

भविष्यात माळीण दुर्घटना उद्भवण्याची भीती:ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी केली पाहणी

⚡कुडाळ ता.२१-: कुडाळ तालुक्यातील वालावल बंगेवाडीमध्ये दरड कोसळून बाबू उर्फ केशव बंगे यांच्या घराला तडे गेले. बंगे कुटुंबीयांनी ताबडतोब ६ घरे खाली केली.

या ठिकाणी भविष्यात माळीणसारखी दुर्घटना उद्भवण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ या प्रकाराची दखल घ्यावी. केशव बंगे यांच्या घराची ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, प्रसाद प्रभू, सुनील करवडकर, नेरूर ग्रामपंचायत सदस्य संतोष कुडाळकर, गोविंद पेडणेकर यांनी पाहणी केली.

You cannot copy content of this page